जिल्हा बॅंकेत 'या' दोन भाऊंची एन्ट्री होणार काय ? जो मजबूत, तो टिकेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

जो मजबूत तोच टिकेल हे नवे समीकरण तयार झाले.

जिल्हा बॅंकेत 'या' दोन भाऊंची एन्ट्री होणार काय ? जो मजबूत, तो टिकेल

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेलमधून सोसायटी गटातून आमदार मानसिंगराव नाईक हे बिनविरोध निवडून आलेत. भाजपाच्या शेतकरी विकास पॅनेलच्‍या संस्था गटातून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन भाऊंची एन्ट्री होणार काय ? याबद्दल तालुक्यात उत्सुकता आहे.

शिराळ्याचे राजकारण नेहमी वेगवेगळी वळणे घेत. इथल्या राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. प्रत्येकजण सोयीचे राजकारण करतो. श्री. देशमुख काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी तालुक्यात आघाडीचा धर्म पाळत ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद सर्व निवडणुकांत देशमुख व आमदार नाईक यांच्या जोडीने माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना कायम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र २०१९ मध्‍ये समीकरणे बदलली. श्री. देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला. अन् कट्टर विरोधक असणारे शिवाजीराव नाईक त्यांचे सहकारी बनले. मित्र मानसिंगराव नाईक कट्टर विरोधक. जे दोन गट एकत्र त्यांचा विजय हे शिराळाच्या राजकारणाचे समीकरण होते. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांनी बाजी मारून बदलवले.

हेही वाचा: 'डुकराशी कुस्ती' फडणवीसांच्या इंग्रजी वाक्यावर राऊतांचा मराठी बाणा

जो मजबूत तोच टिकेल हे नवे समीकरण तयार झाले. श्री. देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पहिलीच निवडणूक होत आहे. ही निवडणूक शिराळा तालुका भाजपच्या अस्मितेची व प्रतिष्ठेची आहे. येथे श्री. देशमुख यांच्या पाठीशी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची ताकद उभी आहे. राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी बिनविरोध होऊन बाजी मारली आहे. ते पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी रान उठवण्यास मोकळे आहेत. त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीची ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. तर देशमुख यांनी विजयी करून शिराळा येथे भाजपला अस्तित्व सिद्ध करण्याची संधी आहे. शिराळा तालुक्यातुन एक भाऊ बँकेत गेलेत. दुसरे जाणार का ? याबद्दलची उत्सुकता आहे.

  • एकूण मतदान २११

  • सोसायटी गट ८९

  • इतर शेती संस्था ३२

  • कृषी पणन संस्था ४

  • नागरी बँका व पतसंस्था ३६

  • इतर संस्था ५०

हेही वाचा: तटकरेंविषयी नाराजीची किनार

loading image
go to top