धनंजय मुंडेंची विधानपरिषदेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

  • महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एका जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एका जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली. विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी 24 जानेवारीला मतदान होईल. धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घोषित झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक आहे. अशात ते विधानसभेवर निवडून आले नसल्याने त्यांना विधानपरिषदेवर आमदार होणे आवश्यक असून ते धनंजय मुंडे यांच्या जागी उमेदवारी स्वीकारणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

मोदींच्या 'या' महत्त्वकांक्षी योजनेत मोठा घोटाळा

7 जुलै 2022 पर्यंत या जागेची मुदत असल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले पोटनिवडणुकीचे वेळापत्रक असे आहे-

  • 7 जानेवारीला अधिसूचना निघेल.
  • 14 जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल.
  • 15 जानेवारीला अर्ज छाननी होणार आहे.
  • 17 जानेवारी ही अर्जमाघारीची अंतिम मुदत असेल.
  • 24 जानेवारीला मतदान होईल.
  • 24 जानेवारीलाच निकालही जाहीर होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legislative Council by-elections on January 24 in maharashtra