esakal | मोदींच्या 'या' महत्त्वकांक्षी योजनेत मोठा घोटाळा
sakal

बोलून बातमी शोधा

fraud cases Found under ayushman bharat health insurance scheme

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी आयुष्यमान भारत या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचं समोर येत आहे. गुजरातमध्ये एकाच कुटुंबाला तब्बल १७०० आयुष्यमान भारत कार्ड दिले असल्याचे आढळून आले आहे. या योजनेतंर्गत एकूण २ लाखांहून अधिक बनावट कार्ड बनविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मोदींच्या 'या' महत्त्वकांक्षी योजनेत मोठा घोटाळा

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी आयुष्यमान भारत या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचं समोर येत आहे. गुजरातमध्ये एकाच कुटुंबाला तब्बल १७०० आयुष्यमान भारत कार्ड दिले असल्याचे आढळून आले आहे. या योजनेतंर्गत एकूण २ लाखांहून अधिक बनावट कार्ड बनविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्तीसगडमध्येही एकाच कुटुंबातील ५७ जणांना या योजनेतून डोळ्यांची सर्जरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पोहचले असून बनावट कार्ड बनविण्याचे सर्वाधिक प्रकार उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड आणि झारखंडमधून या राज्यात घडल्याची बाब समोर आली आहे. 

सत्तेची रस्सीखेच आणि नात्याचा जिव्हाळा म्हणजेच धुरळा !

आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. ज्याचा खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. आयुष्यमान भारत योजनेतील बनावट कार्डाचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये गुजरातमधील एका हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्राने एकाच कुटुंबाच्या नावावर १७०० बनावट कार्ड बनविले आहेत. छत्तीसगडच्या एएसजी रुग्णालयात एका कुटुंबाच्या नावावर १०९ बनावट कार्ड असल्याचं उघड झालं. पंजाबमध्ये दोन कुटुबांच्या नावावर २०० कार्ड बनविण्यात आले आहेत.