
Legislative Council Elections: पदवीधर निवडणुकीसाठी मविआची रणनीती! कोण कुठल्या जागेवर लढणार? जाणून घ्या
मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या (पदवीधर) पाच जागांवरील निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत आज महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मविआतील प्रमुख तीन पक्षांसह इतर पक्ष कुठली जागा लढवतील हे या बैठकीत निश्चित झालं आहे. (Legislative Council Elections MVA Who will fight in which place need to know)
हेही वाचा: RRR Sequel: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या 'RRR'चा येणार सिक्वल; राजामौलींची घोषणा
जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांविषयी मविआच्या प्रतिनिधींची एकत्रितपणे चर्चा झाली. त्यानुसार मविआतील सर्व पक्ष निवडणुकासांठी अर्ज भरणार आहोत तसेच यासाठी सर्वांमध्ये समन्वय साधला जाणार आहे."
कोण कुठली जागा लढवणार?
काँग्रेस - अमरावती आणि नाशिक
राष्ट्रवादी - औरंगाबाद
शिवसेना - नागपूर
शेकाप - कोकणात
हेही वाचा: Hasan Mushrif: शांत झोप लागते म्हणणाऱ्यांवर अजित पवारांचा निशाणा; म्हणाले, आमच्यासोबत...
नागपूरमध्ये काँग्रेसची माघार?
नागपूरची पदवीधर मतदारसंघासाठीची जागा काँग्रेसचं लढवेल अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. पण आता त्यांनी ही जागा सोडल्याचं दिसतं आहे. यावर काँग्रेसनं एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जात आहे. पण पटोले यांनी यावर भाष्य करताना नागपूरच्या जागेवर एकमत करुन उमेदवारी देण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?
या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडी एकजिनसी प्रमाणं जागा लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील पाचही जागा मविआच्या निवडून येतील अशा पद्धतीनं काम केलं जाईल. काँग्रेस एक पाऊल मागं गेलेलं नाही.
महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला जपण्यासाठी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळं नागपूरची जागा आम्ही विचार करुन सोडली आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.