Legislative Council Speaker Poll : विधानपरिषद सभापतिपदासाठी लवकरच निवडणूक; राम शिंदे, दरेकर, लाड यांची नावे चर्चेत

सत्ताधारी युतीची परिषदेतील सदस्य संख्या जवळपास ३० वर पोहोचली
Legislative Council Speaker Election ram shinde darekar lad politics
Legislative Council Speaker Election ram shinde darekar lad politicssakal

मुंबई : ‘विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या देखरेखीखाली कारभार चालवू नये,’ या मागणीवर उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यांसह महाविकास आघाडी आक्रमक असल्याने आता रिक्त असलेल्या सभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय सत्ताधारी युती घेणार असल्याचे समजते.

सत्ताधारी युतीची परिषदेतील सदस्य संख्या जवळपास ३० वर पोहोचली असल्याने आता अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. हे रिक्त पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) रामराजे नाईक निंबाळकर यांना द्यायचे की भाजपकडे ठेवायचे याचा निर्णय लवकरच होईल.

रामराजे यांचा अनुभव दांडगा असला तरी त्यांचे जावई राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. शिवाय भाजपचे संख्याबळ लक्षात घेता हे पद आपल्याकडेच ठेवायला हवे, अशी भूमिका पक्षाकडून मांडली जात आहे.

Legislative Council Speaker Election ram shinde darekar lad politics
Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस; रस्ते वाहतूक मंदावली

धनगर समाजातील नेते व माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. त्यांना संधी मिळाल्यास ओबीसी मतपेटीला न्याय मिळू शकेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

मुंबई बॅंकेचे अध्यक्ष आणि भाजप सत्तेत नसताना खंबीर भूमिका बजावत पक्षाला आधार देणारे प्रवीण दरेकर किंवा शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस यात उत्तम संबंध असलेले उद्योजक प्रसाद लाड यांचेही नाव चर्चेत आहे.

मुंबईतून मंत्रिपदासाठी साठमारी होणार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायम आधार देणाऱ्या या दोन नेत्यांना सभापतीपदाची संधी मिळू शकेल, अशीही चर्चा आहे.

Legislative Council Speaker Election ram shinde darekar lad politics
Nagpur : तलाठी पदभरती अर्ज प्रक्रियेत खोळंबा, ऐन शेवटच्या दिवशी वेबसाईट बंद; हेल्पलाईनही हेल्पलेस

काँग्रेसचा निर्णय बंगळूर बैठकीनंतरच

महाराष्ट्र विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदी कुणाची निवड करायची याचा निर्णय काँग्रेस बंगळूर येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या एकत्र बैठकीनंतर घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर काँग्रेसचे लक्ष आहे.

बंगळूरच्या बैठकीत हजर राहण्याचे आश्वासन ‘राष्ट्रवादी’ने दिले आहे. हा पक्ष नेमका काय करणार यावर महाराष्ट्रातील राजकारण बऱ्याच प्रमाणात अवलंबून असल्याने दोन दिवस कोणतीही घाई करायची नाही, असे काँग्रेस श्रेष्ठींचे मत आहे.

त्यामुळे त्या बैठकीनंतरच विरोधीपक्षनेत्याबद्दलचा निर्णय होईल. महाराष्ट्रात प्रस्थापित असलेल्या नेत्यांव्यतिरिक्त नव्या चेहऱ्याला संधी दिली जावी, असा श्रेष्ठींचा कल आहे. यात सुनील केदार, यशोमती ठाकूर ही नावे आघाडीवर आहेत.

Legislative Council Speaker Election ram shinde darekar lad politics
Nagpur : तलाठी पदभरती अर्ज प्रक्रियेत खोळंबा, ऐन शेवटच्या दिवशी वेबसाईट बंद; हेल्पलाईनही हेल्पलेस

दलित आणि अल्पसंख्याकांची मते मिळावीत या दृष्टीने नितीन राऊत यांचे नावही चर्चेत आहे. नासिकराव तिरपुडे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दलित नेत्याला संधी मिळताच काँग्रेसने महाराष्ट्रात उत्तम कामगिरी केली होती.

हे लक्षात घेता राऊत यांचा विचार व्हावा, असाही मतप्रवाह आहे. हे तिन्ही नेते विदर्भातील असल्याने त्यांच्याऐवजी संग्राम थोपटे यांच्या नावाचा विचार व्हावा, ते पश्चिम महाराष्ट्रातील तरुण नेते आहेत. या भागाला प्राधान्य दिले तर ‘राष्ट्रवादी’शी सामना करता येईल, असाही एक मतप्रवाह आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com