नवाब मलिक जाहीर करणार 'स्पेशल २६', आज नवीन गौप्यस्फोट

drugs
drugsesakal
Updated on

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (drugs party) प्रकरणी एनसीबीची (NCB) कारवाई फर्जीवाडा असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) वर हल्ले सुरूच ठेवले आहेत. मलिक यांनी नवे प्रश्न उपस्थित करत एनसीबी व भाजपवर तोफ डागली आहे. दरम्यान NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याकडून नवाब मलिकांना पत्र प्राप्त झाले आहे. याचा लवकरच खुलासा देखील करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे.

काय आहे ट्विट मध्ये...

एका अज्ञात NCB अधिकाऱ्याकडून मला मिळालेल्या पत्राचा लिफाफा... त्यातील मजकूर मी लवकरच ट्विटरवर प्रसिद्ध करणार आहे

दाऊद वानखेडेबाबत पुन्हा एकदा मोठा दावा

मुंबई ड्रग्स केसवरून (mumbai drugs case) मंत्री नवाब मलिक (nawab malik) आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यात वॉर सुरू आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या वैयक्तिक जीवनावरून गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे (dawood wankhede) असल्याचा दावा नवाब मलिक यांनी काल केला होता. त्यानंतर समीर वानखेडेंच्या वडिलांनी हा दावा फेटाळला होता. मात्र आता नवाब मलिक यांनी दाऊद वानखेडेबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. आणखी एक ट्विट करत मोठा खुलासा केला आहे.

.फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला होता. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट करुन वानखेडे आता चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे छायाचित्र दिसत आहे. मात्र, या प्रोफाईलवर वानखेडे दाऊद असे नाव लिहले आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे की दाऊद वानखेडे या संभ्रमात आणखीनच भार पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com