

road accident
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२६ या १७ महिन्यांत तब्बल एक हजार २३ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. वाहनांचा अतिवेग, सलग ड्रायव्हिंग, विरुद्ध दिशेने वाहतूक, लेन कटिंग, महामार्गांवर थांबलेली वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, वाहतूक यंत्रणेचे दुर्लक्ष, मोबाईलवर बोलणे आणि मद्यपान अशी अपघातांची प्रमुख कारणे आहेत.
बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ, स्थानिक वाहतूक शाखेचे अंमलदार, महामार्ग पोलिस अशी यंत्रणा कार्यरत आहे. तरीपण, अपघातामध्ये ज्यावेळी सहा-आठ जण ठार होतात, त्यावेळी यंत्रणेकडून किती पारदर्शक कारवाई झाली, याची प्रचिती येते. महामार्ग चकाचक झाले, पण सर्व्हिस रोड खराब आहेत, तर काही रोड गॅरेज चालकांनी हडप केले आहेत. दुसरीकडे महामार्गांवर थांबलेली वाहने देखील तशीच उभी असतात.
अपघातप्रवण ठिकाणे ‘जैसे थे’ आहेत. सोलापूर-पुणे महामार्गापासून काही फुटांवर संरक्षक भिंती नसलेल्या उघड्या विहिरी आहेत. वारंवार जिल्हाधिकारी व खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समित्यांच्या बैठका होतात. त्यात जिल्ह्यातील अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या संख्येवर चिंता व्यक्त होते. मात्र, ठोस उपाययोजना काहीच होत नाहीत, असेही अनेकदा पाहायला मिळाले आहे.
१ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२६ पर्यंतची स्थिती
एकूण अपघात
१,६८९
गंभीर अपघात
९३२
अपघाती मृत्यू
१,०२३
अपघाताची वेळ सकाळी ९ ते रात्री ९
महामार्गांमुळे आता वाहनांचा वेग वाढला आहे, त्यामुळे भीषण अपघातांत अनेकांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे ‘ई-चालान’मुळे बेशिस्त वाहनचालकांकडून रोखीने दंड घेतला जात नाही, तर ऑनलाईन दंड केला जातो. त्यामुळे वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात सकाळी ९ ते रात्री ९ या १२ तासांत सर्वाधिक अपघात झाले आहेत. या अपघातांत ६५० हून अधिक जणांचा १७ महिन्यांत मृत्यू झाल्याची नोंद ‘आरटीओ’कडे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.