Raigad News: वाहनाच्या धडकेत जखमी बैलाला स्थानिकांनी दिले जीवनदान
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गजवळ एका बैलाला अज्ञात वाहनाने उडविले असून बैल जखमी होऊन रस्त्याच्या कडेला तडफडत होता. यावर स्थानिकांनी लागलीच उपचार करून त्याला जीवनदान दिले.
पाली : मुंबई गोवा महामार्गजवळ वाकण फाट्यावर सोमवारी (ता. 30) एका बैलाला अज्ञात वाहनाने उडविले. हा बैल जखमी होऊन रस्त्याच्या कडेला तडफडत होता. या बैलावर स्थानिकांनी लागलीच उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पाठवले आहे.