Jitendra Awhad News : आव्हाडांच्या जीवाला धोका! गृह विभागाने दिले महत्वाचे आदेश

life threat to Jitendra Awhad Home ministry ordered to increase his security of ncp Jitendra Awhad
life threat to Jitendra Awhad Home ministry ordered to increase his security of ncp Jitendra AwhadEsakal

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत गृह खात्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नहमी चर्चेत असतात. दरम्यान सध्याची राजकीय स्थीती पाहता आव्हाडांच्या जीवाला धोका असल्याचे गृह विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यादरम्यान जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केलं होतं. यानंतर भाजपकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं यावरून ते नव्या वादात सापडले आहेत.

life threat to Jitendra Awhad Home ministry ordered to increase his security of ncp Jitendra Awhad
Nagpur Murder : नागपूरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाची भरदिवसा हत्या, कारण…

नेमकं काय झालं होतं?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे ‘धर्मवीर’ नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते असे विधान केले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने तात्काळ आक्षेप घेत आंदोलने केली. त्यावरून आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणाऱ्या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरून बरीच वादावादी झाली आहे. खरे तर निष्कारण हा वाद काढण्यात आला. रयतेच्या राजाचे वारसदार छत्रपती संभाजी राजे हे होते. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत, असे आव्हाड म्हणाले होते.

life threat to Jitendra Awhad Home ministry ordered to increase his security of ncp Jitendra Awhad
Viral Video : शेतकरी जोमात, पाहाणारे कोमात; हार्ले डेव्हिडसनवर घालतो रतीबाचे दूध!

छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब जर एवढा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथून त्यांना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो. असे आव्हाड म्हणाले होते.

life threat to Jitendra Awhad Home ministry ordered to increase his security of ncp Jitendra Awhad
Zomato News Update : झोमॅटोचे सह-संस्थापक गुंजन पाटीदार यांचा राजीनामा, कंपनी म्हणते…

पुढे बोलताना त्यांनी, कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो, तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही, तर इतिहासाची पाने बाहेर येतात. जर सगळं शांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com