
New Year 2025: नवीन वर्ष आणि ख्रिसमस सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्याच्या गृहविभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. गृहविभागाच्या या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या निर्णयामुळे बंदोबस्तासाठी तैनात राहणाऱ्या पोलिसांची मोठी दमछाक होणार आहे.