esakal | पालकमंत्र्यांची यादी निश्चित? पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

list of Guardian Ministers may fixed for maharashtra state

पालकमंत्र्यांची यादी निश्चित? पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

पुणे : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते, तरी पालमंत्र्यांची यादी निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालकमंत्र्यांमध्ये मात्र शिवसेनेला झुकते माप मिळाल्याचे दिसत आहे. राज्यात शिवसेनेचे १३, राष्ट्रवादीचे १२ तर, काँग्रेसचे ११ पालकमंत्री राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

काही नवीन पालकमंत्र्यांची संभाव्य यादी

 • मुंबई उपनगर - आदित्य ठाकरे
 • पुणे - अजित पवार
 • मुंबई शहर - अस्लम शेख
 • रायगड - अदिती तटकरे
 • बीड - धनंजय मुंडे
 • जालना - राजेश टोपे
 • यवतमाळ - संजय राठोड
 • नाशिक - छगन भुजबळ
 • नांदेड - अशोक चव्हाण
 • ठाणे - एकनाथ शिंदे
 • परभणी - नवाब मलिक
 • सांगली- जयंत पाटील
 • पालघर- जितेंद्र आव्हाड
 • कोल्हापूर - सतेज पाटील
 • लातूर - अमित देशमुख
 • रत्नागिरी - उदय सामंत
 • सातारा - बाळासाहेब पाटील
 • नगर - बाळासाहेब थोरात
 • नागपूर - नितीन राऊत
 • गडचिरोली - विजय वडेट्टीवार
 • नंदुरबार - के सी पाडवी 
 • जळगाव - गुलाबराव पाटील
 • सोलापूर - दिलीप वळसे पाटील
 • अमरावती - यशोमती ठाकूर
 • हिंगोली - वर्षा गायकवाड
 • औरंगाबाद - अब्दुल सत्तार
 • भंडारा - अनिल देशमुख
 • बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
 • सिंधुदुर्ग - सुभाष देसाई