मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या उपोषणाला आज चौथा दिवस झाला आहे. या आंदोलनात पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी वेळ वाया न घालवता हे विद्यार्थी आपल्या अभ्यासालाच प्राधान्य देत आहेत. आंदोलन चालू असतानाही पुस्तकं आणि नोट्स हातात घेऊन अभ्यास सुरू ठेवणारे हे तरुण आंदोलनाची जाणीव आणि अभ्यासाची जबाबदारी अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी निभावताना दिसत आहेत.