पुण्यातील भवानी पेठ परिसरातील मंथन सचिन भालेराव (वय 19) या युवकावर आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली आहे. स्टेटस दिसताच समर्थ पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली होती. सोशल मीडियावरून गुन्हेगारी टोळ्यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांना हा कठोर इशारा असून, समर्थ पोलीस स्टेशनकडून गेल्या काही महिन्यांतील ही पाचवी MPDA कारवाई म्हणून नोंदली गेली आहे.