दिल्लीत मेक्सिको-इंडिया फ्रेंडशिप ग्रुपचे अध्यक्ष साल्वाडोर कारो यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत बैठक घेतली.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेल वरळी युनिटने वांद्रे येथे तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून ५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत १०.०३ कोटी रुपये आहे. तिन्ही ड्रग्ज तस्करांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कला भेट दिली. तसेच त्यांनी उद्यानातील बाल बोधी वृक्षालाही भेट दिली.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सनातन धर्म हिंदुत्वावर अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबईत ८ ते ९ गोडाऊनला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
केंद्र सरकार बेरोजगारी कमी करण्यासाठी काहीही करत नाही. म्हणूनच काँग्रेस पक्ष २ वर्षांसाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा ३ हजार रुपये आणि डिप्लोमाधारकांना २ वर्षांसाठी १५०० रुपये प्रति महिना देईल, अशी घोषणा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये केली.
कर्मचाऱ्यांची सरकारसोबतची बैठक यशस्वी झाल्याची चर्चा आहे. कर्मचारी तासाभरात संप मागे घेण्याची शक्यता आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सोमवारी सलग सहाव्या दिवशी लोकसभेचे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. सकाळी ११ वाजता पहिल्या सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. २ वाजेनंतरही सभागृहात गोंधळ सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सीबीआय प्रकरणात आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.
जयसिंघानी शिर्डीमार्गे गुजरातल पळाला होता. तांत्रिक बाबींची मदत घेऊन तो आपली ओळख लपवत होता, असं मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. पोलिसांना तो ७२ तास चकवा देत होता. त्याची कारही पोलिसांनी जप्त केली आहे. गुजरात पोलिसांच्या मदतीने अनिल जयसिंघानी याला कलोल इथून अटक करण्यात आली आहे.
औरंगाबाद येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा वाटपातील अनियमिततेच्या संदर्भात ईडीने पीएमएलए अंतर्गत महाराष्ट्रातील औरंगाबाद, पुणे आणि अकोला येथे ९ ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. झडतीदरम्यान विविध आरोप करणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सध्या भाजपा युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. सनातन धर्माबद्दल भाष्य केल्याप्रकरणी हे आंदोलन सुरू आहे.
पुण्यात आज सकाळी वारजे माळवाडी भागामध्ये बिबट्या शिरल्याचं आढळून आलं. याबद्दल चौकशीची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली आहे. पुण्यात बिबट्याने हैदोस घातला आहे. मानवी वस्तीत वारंवार बिबट्या येत आहे. अशा घटना होऊ नयेत, या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो ट्विट केल्याने तिची ओळख झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर बार्शी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राऊत यांना पोलिसांकडून नोटीस बजावली जात आहे. त्यांचे स्टेटमेंट नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे
अनिल जयसिंघानी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात चर्चेत आले होते. त्यांची मुलगी अनिक्षा हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सात वर्ष तो फरार होता.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी ट्वीटरवर एका अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शेअर केला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. याच मागणीसाठी विरोधकांनी सभात्याग केला आहे.
विधानभवनात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रकरणी पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. खोक्यांची पिडा टळू देत, बळीच राज्य येऊ दे अशा घोषणा दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे. विरोधीपक्षाचे आमदार टोपली घेऊन विधानभवनात आले आहेत. या टोपलीमध्ये कांदा आणि द्राक्षे आहेत.
प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे धमकी पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. तसेच वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०६(२), १२०(बी) आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला. शनिवारी मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या कार्यालयात धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात बोगदा खोदणाऱ्या मावळा मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचं काम लांबणीवर पडणार आहे. या मशीनच्या बिघाडामुळे गिरगाव ते प्रियदर्शनी पार्क या 2 किलोमीटरच्या बोगद्याचे काम पुढे ढकलले जाणार आहे. मार्च अखेरीपर्यंत संपणारं हे काम एप्रिलपर्यंत चालेल. आत्तापर्यंत या प्रकल्पाचं ७२ टक्के काम पूर्ण झालं आहे.
पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात बिबट्या आढळला आहे. वारजे माळवाडी भागातील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला. पोलीस अधिकारी व वन विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भागामध्ये बघ्यांची गर्दी जमली आहे.
दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे. वन विभागाने बिबट्याला डार्ट मारुन बेशुद्ध करुन आपल्यासोबत नेलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.