
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आटोपला. त्यानंतर गुंदवली ते मोगरावाडा असा प्रवास केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा मुंबई विमानतळाकडे रवाना झाला आहे. पंतप्रधान मोदी हे विमानाने दिल्लीला जातील.
मेट्रोच्या प्रवासादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो कर्मचारी, मुंबईकर महिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्थानकातून प्रवास सुरु केला आहे. यावेळी पंतप्रधानांनी मेट्रोमध्ये उपस्थित मुंबईकरांशी संवाद साधला. गुंदवली ते मोगरावाडा अशी ही मेट्रोलाईन आहे. यामध्ये तब्बल १३ स्थानकं आहेत.
बीकेसीतील सभा आटोपून मोदींचा ताफा गुंदवली स्टेशनकडे रवाना झाला आहे. याठिकाणी नरेंद्र मोदी मेट्रोतून प्रवास करणार आहे.
मुंबई शहराला चांगलं बनवण्यात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज भारत मोठं स्वप्न पाहण्याचं आणि पूर्ण करण्याचं धाडस करतोय. याआधी फक्त गरिबीवर चर्चा करण्यात येत होती. पण आता आझाद भारताच्या मोठ्या संकल्पावर जगाचा विश्वास आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, आगामी बीएमसीच्या निवडणुकीत भाजपचं सरकार आल्यास विकास अधिक वेगान होईल. मुंबईचा विकास हवा असल्यास स्थानिक पातळीवर सत्ता हवी. यावेळी त्यांनी मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय स्वार्थासाठी अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले गेले.
देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. देशातील रेल्वे स्टेशनही आता विमानतळांसारखी होऊ लागल्याचं पंतप्रधान म्हणाले. सर्वसमान्यांना चांगल्या सुविधा देणं हेच आमचं लक्ष असल्याचे ते म्हणाले.
जगभर भारतासंदर्भात सकारात्मक वातावरण असून, जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था खराब आहे, पण देशात पायाभूत सुविधांवर अनेक कामे सुरु आहेत. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच कामांना वेग आल्याचे मोदी म्हणाले.
नुकत्याच झालेल्या दावोस दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी जो अनुभव सांगितला तो दिसूनय येत आहे. भारताच्या संकल्पावर जगभारातील देशांचा विश्वास आहे.
विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाल्यानंतर मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यांच्या या खास सुरूवातीला उपस्थितांनी टाळा वाजवून दाद दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे रिमोटचे बटण दाबून उद्घाटन करण्यात आले. तसेच वीस बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं लोकार्पणही करण्यात आले.
यावेळी शिंदेंनी सध्याच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले की, सहा महिन्यातच विरोधकांना धडकी भरली आहे. मात्र, विरोधकांना काय टीका करायची आहे ते करू देत, आम्ही याचं उत्तर कामातून देऊ असे शिंदे म्हणाले. जगभरात मोदींच्या नावाचा डंका असल्याचे सांगत, दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा दिसून आला. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत हे फोटो मोदीजींना दाखवा असे सांगत होते. मोदीजींमुळेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे शिंदे म्हणाले.
गेल्या अडीच वर्षात काय झाले यावर मी काही बोलणार नाही, असे म्हणत शिंदे म्हणाले की, फडणवीसांच्या काळात मेट्रोच्या कामांना गती मिळाली. मुंबईकरांचा खड्ड्यातील प्रवास बंद होणार असून, मुंबईतील सर्व रस्ते काँक्रिटचे होणार असल्याचे ते म्हणाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी मोदींमुळे महाराष्ट्रातील विकास कामम सुलभ होत असल्याचे म्हणाले. आजचा दिवस सुवर्णअक्षरात लिहण्याासारखा असून, गेमचेंजर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. मोदींकडून महाराष्ट्राला विशेष अपेक्षा असल्याचेही शिंदे म्हणाले. काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींंच्या हस्ते होऊ नये असे वाटतं होते.
यावेळी बोलताना फडणवीसांनी गद्दारी करत सत्तेत आलेल्या मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वत:चे खिशे भरले. मुंबईकरांना शुद्ध पाणी दिले नाही.
यावेळी फडणवीसांनी नुकताच दावोसचा दौरा करून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पंतप्रधान मोदींसमोर तोंड भरून कौतुक केले. यावेळी त्यांनी राज्यातील डबल इंजिनच वेगवान सरकार आहे. यावेळी त्यांनी गद्दारी करत सत्तेत आलेल्या मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेंनी राज्यासाठी 1 लाख कोटींचे उद्योग आणले असे म्हणत राज्यातील डबल इंजिनचं सरकार बदल घडवणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे आणि मुंबईकरांचे पंतप्रधान मोदींवर विशेष प्रेम असल्याचे सांगत मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. मोदींची देशातील सर्वाधिक लोकप्रियता मुंबईत असल्याचे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीकेसीतील सभास्थळी आगमन झाले आहे. यावेळी भाजपसह शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते उपस्थित आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटा आणि उपरण घालून मोदींचं स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा ताफा मुंबईतील बीकेसी मौदानावरील सभा स्थळी पोहोचला आहे. या ठिकाणी मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झालं आहे. विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर बीकेसीमध्ये त्यांची सभाही पार पडणार आहे.
पूर्वीचे कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान मुंबईत दाखल व्हायला ३० मिनिटं उशीर होणार आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांतून मोदींचं आगमन होणार आहे.
मुंबई दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमध्ये ट्विट केले आहे. "मी मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे.
यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मोदींच्या आजच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारी बरीचशी कामं ही मविआच्या काळात झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.
मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी भाजपसह शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या प्रत्येक अपडेसाठी भाजपकडून ट्विटरवर #MumbaiAwaitsModiJi असा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे.
विविध कामांचा शुभारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसीत उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या सभेत मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोदींचे थोड्याच वेळात मुंबईत आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावर दाखल झाले आहेत.
LIVE PM Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थेड्यात वेळात मुंबईत आगमन होणार आहे. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मोदींच्या या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चे लोकार्पण होणार आहे. याशिवाय मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.