

Maharashtra Zilla Parishad election breaking news
esakal
Maharashtra Zilla Parishad Election Breaking News : राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने खाते उघडले आहे. बांदा आणि खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.