विखेंविरोधात स्थानिक नेते एकवटले

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 डिसेंबर 2019

विखे पिता-पुत्रांचा काढता पाय
या वादामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपच्या पराभूत उमेदवारांनी विखे यांना जोरदार आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. या गदारोळात स्वतः विखे-पाटील आणि खासदार सुजय विखे यांनी बैठकीतून काढता पाय घेणे पसंत केले. अर्ध्यातच बैठक सोडून दोघेही पिता-पुत्र बाहेर पडले. या वेळी विखे पाटील यांना विचारले असता सर्व बोलण्याचा अधिकार राम शिंदे यांना आहेत, त्यांनाच विचारा, असा नाराजीचा सूर व्यक्त केला. प्रत्येक पक्षात नाराजी असतेच असे सांगत विखे-पाटील यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

मुंबई - भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यानंतर आता अंतर्गत कुरबुरी आणि कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत भाजपच्या सर्व पराभूत उमेदवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य केले. संपूर्ण जिल्ह्यात भाजपच्या पराभवास विखे-पाटील हे जबाबदार असल्याची टीका या बैठकीत करण्यात आली. माजी मंत्री राम शिंदे व शिवाजीराव कर्डिले यांनी तर थेट पणे विखे-पाटलांच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. विखे पाटील हे भाजपमध्ये असले तरी जिल्हा परिषदा निवडणुकात मात्र त्यांची भूमिका काय असेल, असा सवालच कर्डिले यांनी केला. विखे पाटील यांच्या पत्नी सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष असून, त्या अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत. 

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी पुढील आठवड्यात होणार आहेत. मात्र विखे पाटील यांच्या पत्नी अजूनही काँग्रसमध्येच आहेत त्यांची भूमिका काय, यावरून या बैठकीत धुमशान झाले. नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी तर विखे पाटील यांना कठोर शब्दांत सुनावल्याचे समजते. विखेंच्या राजकारणावर त्यांनी टीका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local leaders united against the wreckage