अरे बापरे! लॉकडाउनमुळे नागरीकांनी ‘पीएफ’मधून तब्बल एवढ्या कोटींची केली उचल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

लॉकडाउनमुळे मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना घर चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे या कालावधीत भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ईपीएफओ’ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी मंडळाने गेल्या पाच महिन्यांत ३५ हजार ४४५ कोटी रुपयांची प्रकरणे निकालात काढली आहेत.

मुंबई - लॉकडाउनमुळे मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना घर चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे या कालावधीत भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ईपीएफओ’ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी मंडळाने गेल्या पाच महिन्यांत ३५ हजार ४४५ कोटी रुपयांची प्रकरणे निकालात काढली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या वर्षीच्या तुलनेत या पाच महिन्यांत ३२ टक्के अधिक अर्ज निकाली काढण्यात आले; तर निधी वाटपाच्या रकमेत १३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत ९४.४१ लाख कर्मचाऱ्यांनी ‘पीएफ’मधून पैसे काढण्यासाठी अर्ज केले. या दाव्यापोटी भविष्य निर्वाह मंडळाने ३५ हजार ४४५ कोटी रुपयांचे वितरण केले. कोरोनामुळे कार्यालयात उपस्थिती कमी असताना, कामगार मंत्रालयाने विक्रमी वेळेत हे दावे निकालात काढले.

महाराष्ट्रात 10 लाखांवर कोरोना रुग्ण; पुण्याची आकडेवारी चिंता वाढवणारी

कोरोनासंदर्भातील दाव्यांचा जलद गतीने निपटारा केला. भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी ५५ टक्के कोरोना ॲडव्हान्ससाठी होते; तर ३३ टक्के अर्ज उपचारासंदर्भातील होते. अर्जदारांमध्ये जास्त संख्या १५ हजारांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. 

७५ टक्के रक्कम काढण्यास मुभा
लॉकडाउन काळातील भीषण परिस्थिती बघता केंद्र सरकारने ‘पीएफ’ निधीतील जमा रकमेच्या ७५ टक्के रक्कम काढण्यास मंजुरी दिली होती. या अंतर्गत येणाऱ्या दाव्यांना निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाइन व्यवस्था उभी केली होती. बेरोजगार झालेल्या व्यक्तीला जमा रकमेच्या ७५ टक्के रक्कम काढण्याची मुभाही या अंतर्गत दिली होती.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown citizens withdraw crores of rupees from the PF