Lok Sabha 2024: राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे टेन्शन वाढलं! 'या' जागेसाठी काँग्रेस आग्रही; जिल्हाध्यक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक

Lok Sabha 2024
Lok Sabha 2024esakal

अलिबाग : एकेकाळी कोकणात वर्चस्व असलेल्या काँग्रेसकडे लोकसभेसाठी दावा करता येईल, असा एकही मतदारसंघ शिल्लक राहिलेला नाही. यामुळे निदान मावळची तरी जागा काँग्रेससाठी सोडावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत ही जागा लढवण्यास इच्छुक आहेत.

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे बुधवारी (ता. १४) पार पडली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवताना मावळ मतदारसंघात काँग्रेस विजय मिळवेल, अशी आशा घरत यांनी व्यक्त केली.

Lok Sabha 2024
Indurikar Maharaj : 'ते' वक्तव्य इंदुरीकर महाराजांना भोवलं! औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

भिवंडी सोडल्यास कोकणात दावा करता येण्यासारखी एकही जागा काँग्रेसकडे नाही. त्यामुळे मावळची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा सलग तीन वेळा पराभव झालेला आहे. सध्याची परिस्थिती काँग्रेसला पोषक आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, कर्नाटकमध्ये काँग्रेसने मिळवलेला विजय, यासह पोटनिवडणुकांमध्येही पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. मावळ मतदारसंघात शेकापचे विवेक पाटील, ठाकरे गटाचे मनोहर भोईर यांची ताकद आणि राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मतदारांच्या मदतीने विरोधकांवर मात करणे शक्य आहे, असा विश्वास घरत यांनी व्यक्त केला.

मावळची जागा मिळण्यासाठी निवडणूक कमिटीकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या ही कमिटी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे.

मावळच्या बाबतीत आम्ही वरिष्ठांकडे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीसाठी रायगडच्या प्रभारी चारुलता टोकस यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे चंद्रकांत पाटील, राणी अगरवाल उपस्थित होत्या. या बैठकीसाठी जिल्ह्याभरातील काँग्रेस कार्यकर्तेही आले होते.

Lok Sabha 2024
Monsoon Season : पावसाचा अद्याप पत्ताच नाही; 'पेरणी'बाबत कृषी विभागानं दिली महत्वाची अपडेट

जिल्हा कमिटीची नव्याने रचना

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची नव्याने रचना करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह तीन वरिष्ठ उपाध्यक्ष, २९ उपाध्यक्ष, १९ सरचिटणीस नियुक्त करण्यात आले आहेत.

पूर्वीचे दिवस प्राप्त करून देताना अगदी शून्यातून सुरुवात करण्यास काँग्रेस कमिटीची रचना करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसच्या रायगड जिल्हा प्रभारी चारुलता टोकस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com