Lok Sabha Elections 2024: लोकसभेच्या जागावाटपाचा महायुतीत 'या' 13 जागांवर तिढा, अमित शाह तोडगा काढणार?

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. पण यात लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024esakal

Lok Sabha Elections 2024:

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत. बारामती आणि शिरूर लोकसभेचा महाविकासआघाडीचा उमेदवार तरी ठरलेला दिसतोय. सुप्रिया सुळेंनी नव्या चिन्हावर आपली उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवातही केली आहे. पण तिकडे महायुतीचा मात्र अजूनही जागावाटपाचा तिढा कायम आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. पण यात लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. म्हणजे अगदी त्यांनी देशभर आणि राज्यभर वाहवा मिळालेल्या नितीन गडकरींचं नावही घोषित केलेलं नाही. त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

तरी, महायुतीत मुख्यत्वे १३ जागांवर तिढा असल्याची चर्चा आहे. त्या १३ जागा कोणत्या तिथून विद्यमान खासदार कोण? आणि इच्छुक कोण आहेत? कुणाला संधी मिळू शकते? हेच जाणून घेऊया...

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचे काही फॉर्म्युले मागील काही दिवसांपासून चर्चेत होते.

Formula 1

२८ (भाजप) + १० (शिवसेना-शिंदे) + १० (राष्ट्रवादी-अजितदादा)

Formula 2

२८ (भाजप) + १२ (शिवसेना-शिंदे) + ८ (राष्ट्रवादी-अजितदादा)

पण या दोन्ही फॉर्म्युलांवर महायुतीतल्या कुठल्याही पक्षानं अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी, आता महायुतीतल्या १३ वादग्रस्त जागांबद्दल बोलण्याआधी राज्यातील ४८ जागांचं २०१९ नुसार पक्षनिहाय बलाबल समजून घेऊयात-

भाजप - २३
शिवसेना - १८ (१३ शिंदे, ५ ठाकरेंसोबत)
राष्ट्रवादी काँग्रेस- ४  (१ अजितदादा, ३ पवारांसोबत)
काँग्रेस- १ ,
एमआयएम- १,
अपक्ष - १
एकूण ४८

Lok Sabha Elections 2024
Share Market Closing: शेअर बाजारात 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला, अदानी शेअर्सची काय स्थिती?

तर, हे झालं पक्षीय बलाबल... आता पाहूयात येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या कोणत्या १३ जागा वादात किंवा चर्चेत आहे?, जाणून घेऊयात-

१. उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ


विद्यमान खासदार- गजानन कीर्तीकर (शिवसेना, शिंदे गट)
शिंदे गटाचा दावा असला तरी अभिनेत्री आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नाव भाजपकडून चर्चेत आहे.

२. रत्नागिरी-सिंधुदुर्ग


विद्यमान खासदार- विनायक राऊत (शिवसेना, ठाकरे गट)
महायुतीत दोन नावांची चर्चा- भाजप- नारायण राणे, शिवसेना- किरण सामंत

३. रायगड


विद्यमान खासदार- सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)


इच्छुक- भाजपकडून धैर्यशील पाटील

४. शिरुर


विद्यमान खासदार- डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस)


इच्छुक- शिवाजीराव आढळराव पाटील-शिवसेना, प्रदीप कंद- भाजपकडून चर्चेत

५. मावळ


विद्यमान खासदार- श्रीरंग बारणे (शिवसेना, शिंदे गट)


इच्छुक- श्रीरंग बारणे पण आमदार सुनील शेळकेंचा विरोध, राष्ट्रवादीकडून माजी आमदार बाळा भेगडेंचं नाव चर्चेत, पार्थ पवारांचीही चर्चा

६. नाशिक

विद्यमान खासदार- हेमंत गोडसे (शिवसेना, शिंदे गट)


इच्छुक- भाजपातून दिनकर पाटील, सीमा हिरे तर, अजित पवार गटातून माजी खासदार समीर भुजबळ इच्छुक

७. रामटेक

विद्यमान खासदार- कृपाल तुमाने (शिवसेना, शिंदे गट)


इच्छुक- भाजपाकडून माजी आमदार सुधीर पारवे

८. पालघर

विद्यमान खासदार- राजेंद्र गावित (शिवसेना- शिंदे गट)


इच्छुक- राज्याचे दिवंगत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सवरा, त्याचबरोबर नुकतेच भाजपा मध्ये प्रवेश केलेले माजी आमदार विलास तरे यांची नावं भाजपकडून लोकसभेसाठी चर्चेत

९. ठाणे

विद्यमान खासदार- राजन विचारे (शिवसेना- ठाकरे गट)


इच्छुक- रवींद्र फाटक
चर्चा- भाजपकडून संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर

१०. संभाजीनगर

विद्यमान खासदार- इम्तियाज जलील


इच्छुक- संदीपान भुमरे, शिवसेना, शिंदे गट

११. धाराशिव

विद्यमान खासदार- ओमराजे निंबाळकर  (शिवसेना, शिंदे गट)


इच्छुक- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रा. सुरेश बिराजदार, भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले बसवराज पाटील यांचं नाव चर्चेत

१२. परभणी

विद्यमान खासदार- संजय जाधव (शिवसेना, ठाकरे गट)


इच्छुक- भाजपनं दावा सांगितला आहे, भाजपकडून आमदार मेघना बोर्डीकर, त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर इच्छुक; विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ. केदार खटींग इच्छुक. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा सांगत, तिथून शिवसेनेचे नेते तथा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचं नाव चर्चेत आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून राजेश विटेकर जोमानं कामाला लागले आहेत.

१३. यवतमाळ

विद्यमान खासदार- भावना गवळी (शिवसेना, शिंदे गट)

इच्छुक- भावना गवळी आणि भाजपचा पाठिंबा संजय राठोड (शिंदे गटातील २ उमेदवारांमध्ये चुरस)

त्यामुळे आता या १३ जागा होत्या, ज्या जागांवरुन महायुतीत वाद आहे. तरी, आता या जागांचा तिढा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर निघेल, अशी चर्चा आहे. कारण, आज अमित शाहांनी विदर्भातील मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार आहेत. राज्यातील जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं अमित शाहांचा मुंबई आणि महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जातोय. 

Lok Sabha Elections 2024
CJI DY Chandrachud: "तुम्ही ही केस..." ; जेव्हा CJI चंद्रचूड यांनी अभिषेक मनु सिंघवीची केली चेष्टा, कोर्टात नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com