Lok Sabha Election: लोकसभा निवडणुका तोंडावर राज्यात भाजप PM मोदींच्या नावाने राबवणार ११ कलमी कार्यक्रम

भाजपची नवी रणनिती; पक्षाचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवा उपक्रम
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, तळागाळापर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्रात भाजपने 'नमो 11-सूत्री कार्यक्रम' राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमात पायाभूत सुविधा आणि विकासावर भर देऊन महिला, शेतकरी, असंघटित मजूर इत्यादींचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने 11 सामाजिक-आर्थिक कल्याणकारी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

“11-सूत्री नमो कार्यक्रमाद्वारे, आम्ही राज्यभरातील प्रत्येक विभागापर्यंत पोहोचू. महाराष्ट्राचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. मिशन महाराष्ट्र अधिक जोमाने पुढे नेण्याची जबाबदारी आता पक्षाची आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

भाजपने राज्यातील 36 जिल्हे, 355 तालुके आणि 40,000 पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक निकालांबाबत आमचे सर्वोत्तम दावेदार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत आम्ही मोदींना प्रोजेक्ट करू, असे भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.

Lok Sabha Election
Pune News: अजित पवारांच्या खुर्चीत त्यांचाच विश्वासू, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नवी निवड

‘नमो 11-सूत्री कार्यक्रम’ स्मार्ट गावे, स्मार्ट शहरे आणि ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात अधिक कनेक्टिव्हिटीसह सुधारित रस्ते देण्याचे वचन देते. सरकारी योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवणे, बांधकाम कामगारांना सेफ्टी किट देणे, सौरऊर्जेद्वारे गावे स्वयंपूर्ण बनवणे, प्रशासनात अधिक जबाबदारी आणणे, ग्रामपंचायतींना सशक्त करणे इ.नवीन रोजगाराचे मार्ग आणि उद्योजक निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांसह, या कार्यक्रमाचा उद्देश वाढ आणि विकास हा देखील आहे.

Lok Sabha Election
Nitish Kumar : 'मी माफी मागतो, माझे शब्द मागे घेतो'; महिलांबद्दल 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर नितीश कुमार बॅकफूटवर

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांच्या महायुतीमध्ये मोदी फॅक्टर हा महत्त्वाचा दुवा आहे. पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास तळागाळातील मतभेद दूर करण्यास मदत करेल आणि तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगला समन्वय साधता येईल.

महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यातील वाढत्या ध्रुवीकरणानंतरच्या राजकीय गदारोळात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळीही भाजपने आक्रमकपणे मोदी आणि ‘मोदीत्वा’ला प्रोजेक्ट केले.

सोमवारी जेव्हा 2,359 जागांचे निकाल जाहीर झाले, तेव्हा 778 ग्रामपंचायतीवर भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिले. राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला दिले.

Lok Sabha Election
Kolhapur : महाडिक कुटुंबातील 'ही' व्यक्ती लोकसभा लढवणार? समरजित घाटगेंचंही नाव आघाडीवर; मुश्रीफांची भूमिका ठरणार निर्णायक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपची विजयी वाटचाल सुरूच आहे,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. "केंद्राच्या कल्याणकारी योजनांद्वारे, राज्याच्या पुरेशा पाठिंब्याने, विकास प्रत्येक माणसापर्यंत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे," ते पुढे म्हणाले.

राष्ट्रवादीला (अजित पवार गट) 407 जागा मिळाल्या; शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रत्येकी 301 जागा; काँग्रेसला २८७ जागा; शिवसेना (UBT) 115 जागा; आणि इतर, 327.

Lok Sabha Election
Sharad Pawar: मैदानात योद्धा जखमी झाली तरी... मॅक्सवेलची एका पायावरची इनिंग पाहून रोहित पवारांनां आठवले शरद पवार

“या आकडेवारीला काही अर्थ नाही कारण निवडणुका पॅनलनिहाय लढल्या जातात, पक्षाच्या चिन्हावर नाही. पक्षाच्या चिन्हावर लढलेल्या आगामी निवडणुकीत विरोधी पक्ष सत्ताधारी आघाडीला मागे टाकतील,’ असा अंदाज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

युतीतील सर्वात मोठा पक्ष असल्याने, आपल्या सहयोगी भागीदारांना सोबत घेणे ही आपली जबाबदारी असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. 'मेरी माटी, मेरा देश' किंवा 'घर चलो अभियान' या माध्यमातून बावनकुळे यांचा राज्यव्यापी प्रचार भाजपपुरता मर्यादित नव्हता. तसेच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली, ”भाजपमधील एका राजकीय व्यवस्थापकाने सांगितले आहे.

कोणते उपक्रम राबवले जाणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत ‘नमो 11’ या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. यात मुंबई उपनगरं आणि जिल्हात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, आदिवासी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा विकास, शाश्वत विकास या सारख्या 11 विषयांशी संबंधित लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com