esakal | Loksabha 2019 : आता धडाडणार दिग्गजांच्या तोफा
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

...अशा होणार सभा 
  राज ठाकरे (बुधवारी, सायंकाळी सात वाजता, सातारा)
  मुख्यमंत्री फडणवीस (बुधवारी, दुपारी तीन वाजता, कोरेगाव)
  शरद पवार (शुक्रवारी, दुपारी तीन वाजता दहिवडी, त्यानंतर फलटण)
  शरद पवार (शनिवारी, सांगता सभा, सातारा)  
  उद्धव ठाकरे (रविवारी, सांगता सभा, कऱ्हाड)
  धनंजय मुंडे यांच्या सभेसाठी (शुक्रवार, ता.१९) प्रयत्न.

Loksabha 2019 : आता धडाडणार दिग्गजांच्या तोफा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सातारा - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जिल्ह्यात शिगेला पोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आगामी पाच दिवसांत होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दिग्गज नेत्यांच्या सभांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या नेत्यांच्या प्रचार तोफांतून फुटणारे आरोप-प्रत्यारोपांचे गोळे राजकीय वातावरण मात्र ढवळून काढतील.  

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी प्रचाराची राळ उडू लागली आहे. आता पक्षीय पातळीवर होणारी टीका उमेदवारांच्या वैयक्तिक पातळीवर आली आहे. एकेरीवर येऊन होणारी टीका पाहता, पक्षाचे प्रमुख नेते मात्र भाषणात कोणती पातळी गाठणार, याची उत्सुकता सर्वसामान्य मतदारांना आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सातारा लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. या सभांची सुरवात बुधवारपासून होणार आहे. पहिली सभा बुधवारी साताऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची होत आहे. त्यासाठी सभेचे नियोजन सुरू आहे.

याच दिवशी दुपारी तीन वाजता कोरेगावात युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची २० एप्रिलला साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सांगता सभा होणार आहे. तर युतीची सांगता सभा कऱ्हाडला २१ एप्रिलला होणार आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.  

यासोबतच १९ एप्रिलसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभा घेण्याबाबत राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच युतीकडून एकनाथ शिंदे, आदेश बांदेकर, शेतकरी नेते लक्ष्मण वडले यांच्या सभांचेही नियोजन शिवसेनेकडून सुरू आहे.

loading image
go to top