Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

लोकसभा निवडणुकीच्या देशातील पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावल्या.
narendra modi rahul gandhi uddhav thackeray sharad pawar
narendra modi rahul gandhi uddhav thackeray sharad pawarsakal

मुंबई-नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या देशातील पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावल्या. आता सोमवारी (ता.२०) आठ राज्यांतील ४९ जागांसाठी मतदान होईल; यात महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघांचा समावेश आहे. १९ एप्रिलच्या पहिल्या टप्प्यापासून सुरू झालेला वादळी प्रचार अन् आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार आज थांबले. राष्ट्रीय नेत्यांप्रमाणेच प्रादेशिक नेत्यांनी ही निवडणूक अक्षरशः ढवळून काढली.

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची मोठी पलटणच मैदानात उतरली होती तर काँग्रेसकडून राहुल आणि प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील अन्य नेते प्रचारामध्ये सक्रिय झाले होते.

मुंबई आणि नाशिकमध्ये आज सर्वपक्षीयांच्या प्रचाराचा जोर पाहायला मिळाला. नाशिकमध्ये शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली तर ग्रामीण भागांत ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षा’च्या नेत्या सक्षणा सलगर व डॉ.अमोल कोल्हे यांच्या सभांनी प्रचाराची सांगता झाली. राज्यातील १३ मतदारसंघांत २६४ उमेदवार रिंगणात आहेत.

मतदारराजाला साकडे

अखेरच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून मतदारराजाला साकडे घातले. या टप्प्यात मुंबईतील सहाही मतदारसंघासाठी मतदान होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि दक्षिण मुंबईतील भागात रोड शो केला.

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर मुंबई पासून दक्षिण मुंबईपर्यंतचा भाग पिंजून काढला. प्रचार संपण्यापूर्वी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची धावपळ सुरू होती.

दोन्ही गटाला प्रतिसाद

उद्या (ता. २० ) रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य, मुंबई दक्षिण या १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मुंबईतील प्रचाराची सांगता नुकतीच झाली आहे. या दोन्ही सभांना मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. उद्या मतदान होत असलेल्या १३ जागांपैकी महायुतीकडे २०१९ मध्ये ११ जागा होत्या.

या मुद्यांमुळे प्रचाराला धार

  • मोदी की गॅरंटी

  • मंगळसूत्र

  • असली- नकली शिवसेना

  • भटकती आत्मा

  • कांदा प्रश्न, मराठा आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com