Kolhapur Loksabha : प्रकाश आंबेडकरांचा शाहू महाराजांना पाठिंबा; म्हणाले...

Prakash Ambedkar on Shahu Maharaj : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाहू महाराजांना काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
Kolhapur Loksabha : प्रकाश आंबेडकरांचा शाहू महाराजांना पाठिंबा; म्हणाले...

Prakash Ambedkar on Shahu Maharaj : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाहू महाराजांना काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. केवळ काँग्रेसने आपल्या सात उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसने शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी सुरुच आहे. त्यापूर्वीच आता प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर बोलत होते.

Kolhapur Loksabha : प्रकाश आंबेडकरांचा शाहू महाराजांना पाठिंबा; म्हणाले...
Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीचं स्टेटमेंट; भारताचा संताप, परराष्ट्र मंत्रालयाने दूताला घेतलं बोलावून

काँग्रेसकडून सात उमेदवारांच्या नावांची घोषणा

१. नंदुरबार- गोवाल पाडवी

२. अमरावती- बळवंत वानखेडे

३. नांदेड- वसंतराव चव्हाण

४. पुणे- रवींद्र धंगेकर

५. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे

६. सोलापूर- प्रणिती शिंदे

७. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने ज्या सात जागा जाहीर केल्या आहेत,त्या त्यांनी आम्हाला सांगाव्यात. आम्ही त्यांना इतर जागांवर पाठिंबा देणार नाही. येत्या २६ तारखेला आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत. भाजपला सत्तेतून खाली खेचणं, हेच आमचं लक्ष्य आहे.

शरद पवार गटाची संभाव्य यादी

  • बारामती- सुप्रिया सुळे

  • माढा- महादेव जानकर (रासप)

  • सातारा- बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील

  • शिरुर- अमोल कोल्हे

  • नगर दक्षिण- निलेश लंके

  • बीड- बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे

  • वर्धा- अमर काळ

शाहू महाराजांनी मानले आभार

''वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचे मला आत्ताच कळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं.'' अशा शब्दात शाहू छत्रपतींनी आंबेडकरांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com