कोल्हापूर, हातकणंगलेतून शरद पवार हुकमी एक्के काढणार बाहेर; 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा, शेट्टींच्या अडचणी वाढणार

लोकसभेचे कोल्हापूर व हातकणंगले (Kolhapur and Hatkanangle) मतदारसंघ राष्ट्रवादीचे पारंपरिक आहेत.
Loksabha Election Kolhapur Hatkanangle
Loksabha Election Kolhapur Hatkanangleesakal
Summary

हातकणंगलेतील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर : ‘लोकसभेचे कोल्हापूर व हातकणंगले (Kolhapur and Hatkanangle) मतदारसंघ राष्ट्रवादीचे पारंपरिक आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार द्या,’ अशी मागणी काल (बुधवार) शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील बैठकीत केली.

कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, तर हातकणंगलेतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांना मात्र जागा सोडू येऊ नये, अशी जोरकस सूचनाही करण्यात आली.

Loksabha Election Kolhapur Hatkanangle
Gopichand Padalkar : 'डॉ. आंबेडकरांनी आम्हाला आधीच आरक्षण दिलंय, त्याच्या आडवं येणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही'

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी उपस्थित होते.

Loksabha Election Kolhapur Hatkanangle
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांनी मराठ्यांची फसवणूक केली; High Court च्या माजी न्यायमूर्तींचा गंभीर आरोप

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून संघटन वाढवण्याच्या तसेच निष्ठावंतांना घेऊन प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातून आढाव्याची सुरुवात करण्यात आली.

तब्बल अडीच तास चाललेल्या आढाव्यात जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील राजकारणाची स्थिती जाणून घेतली.

Loksabha Election Kolhapur Hatkanangle
Loksabha Election Kolhapur Hatkanangleesakal

यावेळी आघाडीमध्ये तीन पक्ष असले तरी राष्ट्रवादीचे हे दोन्ही मतदारसंघ पारंपरिक आहेत. वातावरण चांगले असून, दोन्ही जागा मागा, आपले उमेदवार नक्कीच निवडून येतील, उमेदवार नाहीत, असे अजिबात नाही. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नावाला एकमताने पसंती दर्शवली.

बैठकीस आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार राजीव आवळे, नितीन जांभळे, मदन कारंडे, पद्मा तिवले, सुनील देसाई, अनिल घाटगे, अश्‍विनी माने, रोहित पाटील, नितीन पाटील, अमर चव्हाण, श्रीकांत पाटील, प्रकाश पाटील, शिवानंद माळी, शिवाजी सावंत, मुकुंद देसाई, विक्रमसिंह जगदाळे आदी उपस्थित होते.

Loksabha Election Kolhapur Hatkanangle
Konkan Politics : ठाकरे गटातील नाराज नेते लवकरच शिंदे गटात येणार, राऊतांनी गळती थांबवावी; उदय सामंतांचा टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने हातकणंगले मतदारसंघ माजी खासदार शेट्टी यांना सोडू नये. त्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली.

या मागणीमुळे हातकणंगलेतील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. बैठकीतील या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना या दोन्ही जागा हव्या आहेत, हे स्पष्ट झाले.

Loksabha Election Kolhapur Hatkanangle
Priya Berde : आतापर्यंत अनेकांनी कलाक्षेत्राकडं दुर्लक्ष केलं, पण भाजपनं कलाकारांना न्याय दिला; मराठी अभिनेत्रीचं मोठं विधान

आम्ही निवडून आणायचे आणि...

हातकणंगले मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा होताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार द्या, अशी मागणी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांना मात्र जागा सोडू नये, असे जोरदार मत मांडले.

आपण मदत करून निवडून आणायचे व नंतर दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा, हा प्रकार नको. त्याऐवजी आपलाच उमेदवार द्या, निवडून येईल. आपणच लढूया, असे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, स्वाभिमानी संघटनेचा महाविकास आघाडीतील समावेश अजून ठरलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com