भोंगा प्रकरण: मुंबई पोलिसांची 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय; 3000 पोस्ट डिलीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Police

भोंगा प्रकरण: मुंबई पोलिसांची 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय; 3000 पोस्ट डिलीट

मुंबई : मशिदीवरील भोंग्याच्या वादामुळे सध्या राज्यभर राजकारण पेटलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटताना दिसत असताना महाराष्ट्र पोलिसांकडून अशा पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांची 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय करण्यात आली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आणि राज्यभर वाद पेटू लागले. मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत खाली उतरवले नाही तर मंदीरावर भोंगे चढवून हनुमान चालीसा वाजवली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यानंतर महाराष्ट्रात आणि देशातील अनेक ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण होतील अशा मेसेजवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा: चीनच्या कुरापती वाढल्या; सीमेजवळ उभारले तीन मोबाईल टॉवर

राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टसाठी आता पोलिसांचे 'सोशल मीडिया लॅब' आता सक्रिय झाले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या माध्यमातून पोलिस सोशल मीडियावरील मेसेज आणि इतर घडामोडींवर लक्ष ठेवत असतात. दरम्यान या प्रकरणातील वाद निर्माण करणाऱ्या जवळपास ३००० पोस्ट सोशल मीडियातून डिलीट करण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि जातीय तेढ निर्माण होतील असे मेसेज पाठवू किंवा फॉरवर्ड न करण्याचं आवाहनही केलं आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये सामावेश करण्यासाठी प्रयत्न

दरम्यान सध्या भोंग्याच्या विषयावरुन राज्यात राजकारण पेटलं असून नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी सर्व अनाधिकृत भोंगे खाली उतरवण्यासाठी आदेश दिले आहेत. सर्व धर्मियांना भोंगे लावण्यासाठी परवानगीची गरज असल्याचं सांगत अनाधिकृत भोंग्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर राज्याच्या गृहखात्यानीही पावले उचलली असून राज्याचे पोलिस महासंचालक जिल्ह्याच्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामध्ये भोंग्याच्या वादावर चर्चा करणार असल्याचं समजतंय.

Web Title: Loudspeaker Case Mumbai Police Delete 3000 Post Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..