Amaravati: नवनीत राणांनी आवाज उठवलेलं लव्ह जिहाद प्रकरण नेमकं काय? वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amaravati: नवनीत राणांनी आवाज उठवलेलं लव्ह जिहाद प्रकरण नेमकं काय? वाचा

Amaravati: नवनीत राणांनी आवाज उठवलेलं लव्ह जिहाद प्रकरण नेमकं काय? वाचा

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने सुशिक्षित तरुणीशी लग्न केलं. सदर युवकांने तीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून घेतले. हा संपूर्ण गंभीर प्रकार खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला.

आंतरधर्मीय विवाहाची परवानगी नसतानाही येथील विजय कॉलनी स्थित चंद्रविला धर्मदाय संस्थेकडून विशिष्ट समुदायातील दोघांचा विवाह लावून बनावट प्रमाणपत्र देण्यात आले होते. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आरोप केला होता. अखेर या प्रकरणात चंद्रविला संस्थेविरुद्ध येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दहशतवादी अजमल कसाबचे वकीलपत्र स्वीकारणारे महेश देशमुख याच संस्थेचे आहेत. त्यामुळे देशद्रोही व्यक्तींच्या मुसक्या बांधल्या पाहिजे, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणीही खासादर डॉ. अनिल बोंडे यांनी केली होती.

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील उच्चशिक्षित तरुणीला रुग्णवाहिका चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने प्रेम जाळ्यात अडकवून अमरावती येथे आणले. विजय कॉलनी स्थित महेश देशमुख यांच्या चंद्रविला चारिटेबल ट्रस्टकडून दोघांचे लग्न लावले होते. संबंधित संस्थेला आंतरधर्मीय विवाह लावण्याची परवानगी नाही. तरीही महेश देशमुख यांच्या संस्थेकडून बनावट मॅरेज सर्टिफिकेट देण्यात आले होते.

आता या प्रकरणामध्ये नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. हिंदू तरुणींशी लग्न करून त्यांच धर्मांतरण केलं जातं तसेच त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला जातो याचा पूर्ण तपास व्हावा असंही नवनीत राणा यांनी म्हंटल आहे.

लव्ह जिहाद म्हणजे काय?

हिंदुत्ववादी संघटनांच्या म्हणण्यानुसार, मुस्लीम तरूण कथितरित्या हिंदू तरुणींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. हा प्रेमाचा बनाव केवळ धर्मांतरणासाठी केला जातो. तसंच मुलींचा शारीरिक आणि लैंगिक छळ केला जातो. त्यांच ब्रेन वॉश केला जातो. हिंदुत्ववाद्यांकडून आपली खरी ओळख लपवून (विशेषत: मुस्लीम धर्म) मुलीला फसवण्याच्या प्रकाराला 'लव्ह जिहाद' संबोधलं जातं. गेल्या काही वर्षांपासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण बरंच तापलं आहे.

Web Title: Love Jihad Controversy Amravati Navneet Rana Dr Anil Bonde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amravatinavneet rana