

Bay of Bengal Low Pressure Area Maharashtra Weather Update
esakal
Bay of Bengal Weather System : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, मध्य बंगालच्या उपसागरात उद्या (ता. १६) चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. एकीकडे समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असताना दुसरीकडे राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळी गारठा जाणवत असला, तरी दुपारी उन्हाचा चटका कायम आहे. शनिवारी (ता. १४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १५) राज्यातील किमान तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.