नाशिक रेल्वे अपघात : ८ एक्सप्रेस रद्द, ६ गाड्यांचे मार्ग बदलले

LTT Jaynagar Express Derailed Nashik
LTT Jaynagar Express Derailed Nashik e sakal

मुंबई : मुंबईहून निघालेली एलटीटी-जयनगर एक्सप्रेसचे (LTT Jaynagar Express Derailed Nashik) १० डबे रुळावरून खाली घसरले. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत, तर काही प्रवासी अद्यापही रेल्वेत अडकले आहेत. डाऊन मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काहींचे मार्ग वळविण्यात आले आहेत.

LTT Jaynagar Express Derailed Nashik
नाशिकजवळ रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले; एक प्रवाशी ठार, अनेक जखमी

नाशिकजवळील लहवित - देवळाली स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेसचे (Nashik Railway Accident) काही डबे दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या सुमारास रुळावरून घसरले. डाऊन मार्गावर हा अपघात झाला आहे. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत, एकाचा मृत्यू झाला. सध्या बचावपथक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. पण, अपघात झाल्यानंतर अर्धा तास होऊनही मदत न मिळाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. मध्ये रेल्वेने ट्विटरवरून या अपघाताची माहिती दिली आहे.

या गाड्या रद्द -

डाऊन मार्गावर अपघात झाल्यामुळे मुंबई रेल्वेस्थानकावरून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहे.

  • पंचवटी एक्सप्रेस

  • नंदीग्राम एक्सप्रेस

  • सीएसएमटी ते नांदेड एक्सप्रेस

  • नांदेड ते सीएसएमटी एक्सप्रेस

  • पुरी ते एलटीटी एक्सप्रेस

  • सीएसएमटी ते अमरावती एक्सप्रेस

  • अमरावती ते सीएसएमटी एक्सप्रेस

  • सीएसएमटी ते सिकंदराबाबद एक्सप्रेस

या गाड्यांचे मार्ग बदलले -

  1. हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस

  2. हावडा दुरंतो एक्सप्रेस

  3. उद्योग नगरी एक्सप्रेस

  4. एलटीटी ते सुलतानपूर एक्सप्रेस

  5. सीएसएमटी ते हावडा एक्सप्रेस

  6. एलटीटी ते सुलतानपूर एक्सप्रेस

या गाड्या तात्पुरत्या टर्मिनेट

  • आदिलाबाद ते सीएसएमटी एक्सप्रेस

  • सिकंदराबाद ते सीएसएमटी एक्सप्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com