मुंबई - राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी दोन कोटी ४७ लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कसे, या प्रश्नाचे उत्तर पडताळून पाहण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.