शतकातील सर्वाधिक कालावधीचे चंद्रग्रहण 27 अन्‌ 28 जुलैला होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

नाशिक - शतकातील दीर्घ कालावधीचे चंद्रग्रहण 27 आणि 28 जुलैला अनुभवायला मिळेल. खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी 1 तास 43 मिनिटे इतका असेल आणि हे ग्रहण देशवासीयांना पाहायला मिळेल. दरम्यान, इतक्‍या दीर्घ कालावधीचे चंद्रग्रहण यापूर्वी 16 जुलै 2000 आणि 15 जून 2011 ला झाले होते. मात्र आता होणाऱ्या ग्रहणाचा कालावधी त्याहीपेक्षा अधिक असेल.

मंगळ ग्रह आणि सूर्य एकमेकांच्या समोर 27 जुलैला येतील. त्यांच्यामध्ये पृथ्वी असेल. त्यामुळे मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येईल आणि तो 27 जुलै संध्याकाळपासूनच तेजस्वी दिसेल. 27 आणि 28 जुलैला उघड्या डोळ्यांनी ते पाहता येईल. 31 जुलैला मंगळ ग्रह पृथ्वीच्या आणखी जवळ येईल. दर दोन वर्षे दोन महिन्यांनी मंगळ ग्रह सूर्याच्या थेट समोर येतो. त्यामुळे पृथ्वीच्या तो अत्यंत जवळ येतो.

खग्रास चंद्रगहणाविषयी
27 जुलैला रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू.
28 जुलैच्या रात्री एकला संपूर्ण चंद्रग्रहण दिसायला सुरवात होईल
खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी 2 वाजून 43 मिनिटांपर्यंत असेल
पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी ग्रहण सुटेल

Web Title: Lunar eclipse