महाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील एकूण 942 पोलिस अधिकारी कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली. देशभरातून शौर्यासाठी 2  राष्ट्रपती पोलिस पदके, शौर्यासाठी 177 पोलिस पदके, उत्कृष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलिस पदके आणि उत्कृष्ट सेवेसाठी 675 पोलिस पदके जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी कर्मचा-यांना ही पदके जाहीर झाली आहेत. तसेच राज्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन अधिका-यांनाही पोलिस पदके जाहीर झाले आहेत. मुंबई येथील राखीव पोलिस दलाचे निरीक्षक राधेश्याम पांडे आणि नागपूर चे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांना ही पोलिस पदके जाहीर झाली आहेत.

 राज्यातील ३ पोलिस अधिकारी -कर्मचा-यांना राष्ट्रपती पोलिस पदके

1) श्री. शिवाजी तुळशीराम बोडखे ,सहायक पोलिस आयुक्त, नागपूर
2) श्री. दयानंद हरिश्चंद्र ढोमे , पोलिस निरीक्षक,  चतुश्रृंगी पोलिस स्टेशन, पुणे 
3) श्री. बाळु प्रभाकर भवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष, नाशिक 

८ पोलिस अधिकारी -कर्मचा-यांना शौर्य पदके जाहीर                           

१) शितलकुमार अनिल कुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक.
२) हर्षद बबन काळे, पोलीस उपनिरीक्षक.
३) प्रभाकर रंगाजी मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल.
४) महेश दत्तु जाकेवार, पोलीस कॉन्स्टेबल.
५) अजितकुमार भगवान पाटील, पोलीस उपनिरीक्षक.
६) टिकाराम संपतराय काटेंगे, नायब पोलीस कॉन्सटेबल.
७) राजेंद्र श्रीराम तडमी , पोलीस कॉन्स्टेबल.
८) सोमनाथ श्रीमंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल.

उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील ४० पोलीस अधिकारी कर्मचा-यांना पोलीस पदके 

1) नविनचंद्र दत्ता रेडी्, पोलिस उपआयुक्त, झोन 10, अंधेरी, मुंबई.
2) डॉ. पंजाबराव वसंतराव उगले, पोलिस अधिक्षक, दहशतवादी निरोधक दस्त,नाशिक
3) श्रीकांत व्यंकटेश पाठक, कमांडर, राज्य राखीव पोलिस बल गट-3, दौंड
4) सारंग दादाराम आवाड, पोलिस उपआयुक्त,पुणे महानगर विकास प्राधिकरण, पुणे.
5) रविंद्र महादेव महापडी, सहायक कमांडर, राज्य राखीव पोलिस बल गट-11, नवी मुंबई
6) शिरीष सुधाकर सावंत,सहायक पोलिस आयुक्त, गावदेवी विभाग, मुंबई शहर, मुंबई
7) सुदर्शन लक्ष्मणराव मुंढे, पोलिस उपअधिक्षक,उपविभाग कर्जत,अहमदनगर.
8) धुला ज्ञानेश्वर तेले, पोलिस उपअधिक्षक, इओडब्लू, नांदेड.
9)  विठ्ल नामदेव मोहिते,पोलिस निरीक्षक, एमटी, स्टेशन नवी मुंबई.
10) सतीष गणपत मयेकर, पोलिस निरीक्षक, एटीएस, मुंबई.
11)  गौतम कृष्णा गायकवाड, आर्म्ड पोलिस निरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल गट - 5 नागपूर.
12) प्रिनम नामदेव परब,पोलिस निरीक्षक, पंतनगर पोलिस स्टेशन, मुंबई शहर, मुंबई.
13) योगेंद्र चंद्राकांत पाचे, पोलिस निरीक्षक, एलटी मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई शहर, मुंबई.
14) अजय खाशाबा जाधव, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर, मुंबई.
15) गणपत दिनकर पिंगळे, पोलिस निरीक्षक, चितळसर पोलिस स्टेशन, ठाणे शहर, मुंबई
16) राजेंद्रसिंग प्रभुसिंग गौर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.
17) अनंत महिपतराव कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, जिल्हा स्पेशल गुन्हे शाखा, उस्मानाबाद.
18) विठ्ल खंडूजी कुबडे, पोलिस निरीक्षक, छिंदवाड पोलिस स्टेशन, पुणे.
19) दिगंबर केशव झाकडे, पोलिस उपनिरीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन,पुणे.
20) किशोर मुकुंद अत्रे, पोलिस उपनिरीक्षक,बिनतारी संदेश कक्ष, पुणे.
21) दत्तात्रय बाबुराव मासाळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, कोल्हापूर.
22) रविंद्र बळीराम सपकाळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, जळगांव.
23) अरूण संपत अहिरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, अंबड पोलिस स्टेशन नाशिक शहर नाशिक.
24) कृष्णाजी यशवंत सावंत, सहायक पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा,मुंबई.
25) अरीफखान दाऊदखान पठाण, ड्रायव्हर, सहायक पोलिस उपनिरीक्षक, डीसीपी झोन दुसरे कार्यालय नाशिक शहर.नाशिक.
26) शेख जलील उस्मान, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पीसीआर, अहमदनगर.
27) सुभाष नाना जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक, नाशिक रोड पोलिस स्टेशन, नाशिक शहर
28) चंद्रकांत सुर्यभान इंगळे, हेड कॉन्सटेबल, गुन्हे शाखा पुणे शहर, पुणे.
29) सय्यद अफसर सय्यद जहुर, पोलिस हेड कॉन्सटेबल, स्थानिक गुन्हे शाखा, परभणी.
30) सिध्दराय शिवाप्पा सत्तीगिरी, पोलिस हेड कॉन्सटेबल, डोंगरी पोलिस स्टेशन, मुंबई शहर,मुंबई.
31) नेताजी दत्तात्रय देसाई, पोलिस हेड कॉन्सटेबल, लाच लुचपत प्रतिबंध शाखा, वरळी मुंबई.
32) प्रभू कोंडीबा बेलकर, पोलिस हेड कॉन्सटेबल, गुन्हे शाखा, मुंबई शहर, मुंबई.
33) संतोष संभाजीराव दरेकर, पोलिस हेड कॉन्सटेबल, गुन्हे शाखा, मुंबई शहर,मुंबई.
34 रमाकांत देवराव बाविस्कर, पोलिस हेड कॉन्सटेबल, पीसीआर, नागपूर.
35) वसंत शंकर पन्हाळकर, पोलिस हेड कॉन्सटेबल, स्थानिक गुन्हे शाखा,कोल्हापूर.
36) नानाकुमार सुरेशप्रसाद मिसार, शोध अधिकारी , राज्य गुप्तचर विभाग,नाशिक.
37) अविनाश राजाराम लिंगावळे, पोलिस हेड कॉन्सटेबल, गुन्हे शाखा विभाग, मुंबई शहर, मुंबई.
38) पांडुरंग अनंत शिंदे, पोलिस हे्ड कॉन्सटेबल, डीबी मार्ग पोलिस स्टेशन,मुंबई.
39) चिमाजी धोंडिबा बाबर,पोलिस हेड कॉन्सटेबल,पोलिस प्रशिक्षण केंद्र,लातूर.
40) रमेश शामराव सुर्वे, पोलिस हेड कॉन्सटेबल, धारावी पोलिस स्टेशन मुंबई शहर,मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The magnificent work of Maharashtra Police; 51 policemen honored with pride