Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, राज्यमंत्रीही घेणार शपथ; फडणवीसांची माहिती

बच्चू कडूंची नाराजी दूर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष
second cabinet expansion
second cabinet expansionesakal
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळं आता या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळतेय हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Maha Cabinet will soon be expanded Minister of State will also take oath Info gives by Devendra Fadnavis)

second cabinet expansion
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ब्रिटनवासियांना सूनक यांनी दिला विश्वास; म्हणाले...

आत्तापर्यंत राज्यात फक्त कॅबिनेट मंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्यमंत्री म्हणून कोणीही शपथ घेतली नव्हती, त्यामुळं पुढच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल हे पाहाणं औत्सुक्याचं असणार आहे. पण हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बच्चू कडूंची नाराजी दूर होणार का?

शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदेंचं सरकार स्थापन होताच यामध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी आशा बच्चू कडू यांना होती. पण तसं घडलं नाही, त्यामुळं त्यांनी अनेकदा जाहीररित्या नाराजीही व्यक्त केली होती. पण आपल्याला मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळं पुढच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना संधी मिळतेय का हे पहाणं औत्सुक्याच ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com