

Mahabhumi Stack Maharashtra
esakal
Mahabhumi Stack Portal : राज्यातील जमिनींच्या मालकी हक्कासह विविध प्रकारची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. महसूल व वन विभागाने विकसित केलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ या एकात्मिक डिजिटल प्रणालीचा प्रारंभ झाला आहे. या प्रणालीमुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढून फसवणुकीला आळा बसणार आहे. तसेच गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.