Mahadev Jankar : 'माझी बहीण मुख्यमंत्री बनेल पण पक्षावर विश्वास नाही', जानकरांच्या वक्तव्यामुळं खळबळ

Mahadev Jankar News: महादेव जानकर यांचे खळबळजनक वक्तव्य
Mahadev Jankar critics on bjp pankaja munde maharashtra politics dro95
Mahadev Jankar critics on bjp pankaja munde maharashtra politics dro95

भाजपकडून युतीसाठी फारसा प्रतिसाद मिळत‎ नसल्याने नाराज झालेल्या राष्ट्रीय समाज‎ ‎पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे. (Mahadev Jankar critics on bjp )

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महादेव जानकर‎ बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

या देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय तुमच्या समाजाचं भलं होणार नाही. याचा विचार केला पाहिजे. आमच्या बहिणीच्या पार्टीमुळे समाजाचं हित होणार नाही. माझी बहीण मुख्यमंत्री बनेल पण समाजाचं हित होणार नाही. कारण रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात राहील. मालक दुसराच राहील, पक्षावर विश्वास नाही, असं जानकर म्हणाले.

जानकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

Mahadev Jankar critics on bjp pankaja munde maharashtra politics dro95
Amol Kolhe: अजित पवारांचा जवळचा नेता बंड करणार? अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात लागले बॅनर

यापूर्वी, इलेक्शन‎ ‘आपल्या चौकात आपली औकात’ हे मिशन ठरवून कार्यकर्ते कामाला‎ लागले आहेत. भाजप असो वा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि‎ एकनाथ शिंदे यांचा पक्ष, निवडणुकीत युती अथवा आघाडीसाठी‎ आम्हाला सोबत घ्या, म्हणून आम्ही त्यांच्या मागे जाणार नसल्याचे जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi News)

Mahadev Jankar critics on bjp pankaja munde maharashtra politics dro95
Pankaja Munde: 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच... ', पंकजा मुंडे यांचं सूचक विधान

फडणवीस यांच्या‎ नेतृत्वातील सरकारमध्ये जानकर यांचा पक्ष‎ सहभागी होता. त्यांना विधान परिषदेवर संधी‎ देण्यात आली. मंत्रिपदही मिळाले होते. पण‎ फडणवीस सरकार गेले. जानकरांचा‎ आमदारपदाचा कार्यकाळ संपला. तत्पूर्वीच‎ रासप आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com