Amol Kolhe: अजित पवारांचा जवळचा नेता बंड करणार? अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात लागले बॅनर

राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत
Amol Kolhe: अजित पवारांचा जवळचा नेता बंड करणार? अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात लागले बॅनर

राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेले दोन दिवस लोकसभा मतदार संघ निहाय आढावा घेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसकडुन सुरू आहे. स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्या-त्या मतदार संघातील आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहेत. अशातच कागल मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ, जळगाव ग्रामीणमधुन गुलाबराव देवकर त्यासोबतच अनिल पाटील हे नेते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. (Latest Marathi News)

तर दुसरीकडे शिरूर मतदार संघातून यंदा खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेचे तिकीट मिळेल का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र दिलीप वळसे पाटील सध्या परदेशात असल्यामुळे यावर 5 जून रोजी चर्चा होईल अशी माहिती आहे. तर माढ्यातून संजीव राजे नाईक निंबाळकर इच्छुक आहेत.(Latest Marathi News)

Amol Kolhe: अजित पवारांचा जवळचा नेता बंड करणार? अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात लागले बॅनर
Uddhav Thackrey: ठाकरेंचं टेन्शन वाढलं? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 आमदार शिंदेंच्या वाटेवर

अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचे काही बॅनर पाहायला मिळत आहेत. यामुळे शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यानेच दंड थोपटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले आहेत. या बॅनर्सवर विलास लांडे यांना भावी खासदार संबोधण्यात आलं आहे आणि तसंच संसदेचा फोटोही दिसून येत आहे.(Latest Marathi News)

Amol Kolhe: अजित पवारांचा जवळचा नेता बंड करणार? अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात लागले बॅनर
Prashant Corner Case: श्रीकांत शिंदेंची पत्नी आणि मिठाईच्या दुकानाचा वाद! काय आहे संपूर्ण प्रकरण

तर शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विलास लांडे यांची ओळख आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देखील माजी आमदार विलास लांडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. अमोल कोल्हे सध्या राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती.(Latest Marathi News)

तर अमोल कोल्हे यावेळी शिरूर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत तर याठिकाणी दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं खासदारकीची उमेदवारी कुणाला देणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.(Latest Marathi News)

Amol Kolhe: अजित पवारांचा जवळचा नेता बंड करणार? अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात लागले बॅनर
Shivsena: फडणवीस शिंदेंची मध्यरात्रीची बैठक अन् आता गजानन कीर्तिकरांचा यू टर्न; राजकीय घडामोडींना वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com