
Devendra Fadnavis: बीडच्या परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांचा खून होऊन २१ महिने झाले. पोलिसांनी अद्यापही आरोपी अटक केलेले नाहीत. आजपर्यंत ज्या पोलिसांनी याचा तपास केला, त्यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणात उणिवा ठेवण्याचं काम केलं. त्यामुळे आता पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणं अवघड होत आहे. मात्र पीडित कुटुंब सातत्याने आरोपींच्या अटकेची मागणी करीत आहे.