छत्रपतींकडून पगडी म्हणजे माझ्यासाठी जबाबदारी : मोदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

 छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले आहे. हा माझा सन्मान असून, त्यांच्याप्रती माझी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नाशिक :  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले आहे. हा माझा सन्मान असून, त्यांच्याप्रती माझी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप नाशिकमध्ये झाला. या यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. 

उदयनराजेंकडून मोदींच्या डोक्यावर शिवकालीन पगडी

आज सभेच्या ठिकाणी मोदींचे आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहिले. यावेळी उदयनराजेंनी मोदींच्या डोक्यावर मोत्यांनी सजवलेली शिवकालीन पगडी घातली. मोदी सभास्थळी दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahajanadesh Yatra Nahik Narendra Modi said This is my honor and I have a responsibility to them