

Indian Railways train cancellation timetable
esakal
Train Cancellation Schedule Maharashtra : भारतीय रेल्वे म्हणजे सर्वसामान्यांचा सर्वात स्वस्त प्रवास करण्याचे दळवळणाचे साधन आहे. दररोज कोट्यवधी रेल्वे प्रवासी कामधंद्याशी, कुटुंबासोबत प्रवास करत असतात. मात्र, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांमुळे काही काळ रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रासह देशभरातील १४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये गोंदिया जिल्ह्याला याचा मोठा फटका बसणार आहे.