

Maharashtra Loan Waiver
esakal
मुंबई: राज्य सरकारने सन २०२६ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून कर्जखाती निरंक करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली. मात्र, दुसरीकडे २०१७ च्या 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'तील सहा लाख ६४ हजार शेतकरी नऊ वर्षे उलटूनही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. पात्र असूनही राज्यातील ६.५६ लाख कर्जखात्यांचा ५,९७४ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी अडकला आहे. पावसाळी अधिवेशनात यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.