

Voters queue up at polling booths as Maharashtra begins voting for 264 Nagar Parishad and Nagar Panchayat elections after eight years.
esakal
राज्यातल्या २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. तर उद्या ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसह स्थानिक नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात तब्बल ८ वर्षांनतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आज हजारो उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यंत्रणाही अलर्टवर आहेत.