कृषी दिन विषेश: ठिबक सिंचनाचा 'एकुरका पॅटर्न' ठरतोय राज्यात आदर्श

दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची गावातील तरुणांना माहिती झाली. त्यातून या तरुणांनी पुढाकार घेऊन काम करायला सुरुवात केली.
Osmanabad
OsmanabadOsmanabad

उस्मानाबाद: एकुरका गावातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ठिबक सिंचन वापरून कृषी क्षेत्रात एक वेगळा आदर्श तयार केला आहे. युवक शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच कृषी सहाय्यक, मंडळकृषी अधिकारी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापरण्यास प्रोत्साहित करीत आहेत. दरम्यान ठिबक सिंचनाने उत्पादनात वाढ झाली असून फायदा झाल्याने अनेक शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळले आहेत. एकुरका (ता. कळंब) या गावाचा एक वेगळाच अनोखा पॅटर्न तयार झाला असून त्याला शासनाच्या पोक्रा योजनेची जोड मिळाली आहे. कळंब शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतराव एकुरका गाव आहे. गावाला ८१४ हेक्टरचा शिवार आहे. गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्प राबविला जात आहे.

दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची गावातील तरुणांना माहिती झाली. त्यातून या तरुणांनी पुढाकार घेऊन काम करायला सुरुवात केली. श्रीकांत भिसे, मनोज घोगरे, विक्रम घोगरे, रजनीकांत भिसे, सिद्धेश्वर घोगरे यांच्यासह गावातील इतर तरुण शेतकऱ्यांनी या योजनेचा प्रभावी वापर करण्याचे निश्चित केले. त्यातून या तरुणांनी गावातील क्षेत्र ओलिताखाली कसे येईल, याकडे लक्ष दिले. त्यासाठी प्रत्येकाने ठिबक सिंचन योजना वापरण्याच्या सुचना शेतकऱ्यांना केल्या. विशेष म्हणजे ऊसाची लागवड केली तरीही त्याला ठिबक सिंचन वापर करावा, असे सुचित केले. दरम्यान त्यासाठी पोक्रा योजनेतून तत्काळ ठिबकची फाईल मंजूर करण्यात आल्या. योजनेचे पैसेही शेतकऱ्यांना त्याच्या खात्यावर तत्काळ पडले. त्यामुळे प्रत्येकाने ठिबक सिंचन संच वापरले आहेत.

Osmanabad
चांगला परतावा पाहिजे? मग 'या' पाच योजनेत करा गुंतवणूक

ना धरण, ना नदी तरीही ८० टक्के ओलिताखाली क्षेत्र

गावाच्या कार्यक्षेत्रात कोठेही धरण नाही. शिवाय परिसरात कोणतीही मोठी नदी नाही. तरीही गावातील तरुण शेतकऱ्यांनी कष्ट आणि मेहनत करीत पोक्रा योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. तीन यापूर्वीच गावचे केवळ पाच ते १० टक्के क्षेत्र ओलिताखाली होते. मात्र युवकांनी पुढाकार घेऊन योजना राबविल्याने सध्या गावातील सुमारे ७० ते ८० टक्के क्षेत्र ओलिताखाली आले आहे. शिवाय त्यातून ठिबक सिंचनाचा वापर केल्याने ऊसाचा उताराही वाढला आहे. तसेच फळबागांचे प्रमाणही वाढले आहे. यातून लाभ घेतलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झाल्याने अनेक शेतकरी सध्या ठिबकसिंचनाकडे वळले आहेत. गावातील २९६ शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. यातील १०७ शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला असून त्यांना सुमारे ७४ लाख ६२ हजार ५७१ रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे.

असे वाढल्या फळबागा

गावात ठिबक सिंचनाचा फायदा लक्षात येताच गावातील शेतकऱ्यांनी त्यातून फळबागावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. वाढत्या ठिबक सिंचनामुळे पेरु ३० एकर, केळी ३६ एकर, पपई २२ एकर, भाजीपाला ३५ एकर एवढे क्षेत्रावर फळबागा आणि भाजीपाला वाढला आहे.

मागेल त्या पात्र लाभार्थ्यांना पोक्रा योजनेतून लाभ दिले जात आहेत. शिवाय लाभार्थी केवळ अनुदान मिळावे, या हेतूने मुळीच योजना घेत नाहीत. तर त्याचा कायम फायदा कसा होईल, याकडे पाहतात. गावात गट-तट न ठेवता, प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना योजनेतून लाभ दिला जात आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांसह गावातील बेरोजगारांना झाला आहे.

- मनोज घोगरे, उपसरपंच.

Osmanabad
'विद्यापीठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयांतील शुल्कांत कपात'

शेतकरी म्हणून फायदा घेत असताना कुठेही भेदभाव ठेवत नाहीत. गाव १०० टक्के ठिबक सिंचनाखाली यावे, यासाठी शेतकऱ्यांना फायदा दाखवून दिला. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अनुभव आल्याने प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचनाचा लाभ घेतल्याने गावात १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- श्रीकांत भिसे, शेतकरी

या उपविभागाअंतर्गत गावाने चांगले काम केले आहे. पोक्रा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गावातील तरुण एकत्र आल्याने चांगला फायदा दिसून येत आहे. गावातील तरुण स्वतः याचा फायदा झाल्याचे उघडपणे सांगत असल्याने योजना चांगली राबविली आहे.

- बजरंग मंगरुळकर, उपविभागीय अधिकारी, भूम.

मंगळवारी (ता. २९) आवर्जून या गावाला भेट दिली आहे. अनेक ठिकाणी शेतावर जावून पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी ठिबक दिसून आले. सर्व तरूण स्वतः पुढाकार घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे १०० टक्के ठिबक सिंचन असणारे मराठवाड्यातील एकमेव गाव असावे. परिणामी फळबागा वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना शासनाच्या पोक्रा योजनेचा चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले.

- विजय कोळेकर, कृषी विद्यावेत्ता (मुंबई), पोक्रा योजना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com