Maharashtra agriculture university recruitment 2026
esakal
मुंबई : राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने चारही कृषी विद्यापीठांच्या ‘गट-अ’ आणि ‘गट-ब’ संवर्गातील एकूण तीन हजार ७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला (स्टाफिंग पॅटर्न) मंजुरी दिली (Maharashtra agriculture universities) आहे. तब्बल २३ वर्षांनंतर, म्हणजेच २००३ नंतर पहिल्यांदाच हा नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला असून, यामुळे विद्यापीठांमधील प्रशासकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.