Maharashtra Farmer Loan Waiver First Installment
esakal
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला टप्पा सुरू करत तब्बल ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२९ कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम संबंधित बँकांच्या कर्जखात्यांमध्ये हस्तांतरित केली.