Maharashtra Transport : लालपरी’चा ७७ वा वर्धापनदिन; उत्कृष्ट अधिकार्यांना अध्यक्ष सुवर्णपदकाने सन्मानित
MSRTC : एसटीच्या ७७व्या वर्धापनदिनी ‘स्मार्ट एसटी’ संकल्पनेचा प्रारंभ करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरक्षित आणि स्वच्छ एसटीची ग्वाही दिली व विविध विभागातील उत्कृष्ट अधिकार्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.
मुंबई : भविष्यात दळणवळण क्षेत्रातील संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ ‘स्मार्ट एसटी’ उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.