Andheri Election: शिंदे गटाकडून अंधेरी पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता; काय आहे कारण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार?
Andheri Election News
Andheri Election Newsesakal
Updated on

मुंबईः अंधेरी पूर्व पोटनिवडणूक शिंदे गट लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर आज रविवारी पुन्हा ही निवडणूक शिंदे गट लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शनिवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशुळ या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह द्यावं, अशी मागणी केलीय. त्यामुळे आता शिवसेनेला कोणतं चिन्ह मिळणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

भाजपच्या फायद्यासाठी शनिवारी शिंदे गटाकडून एक निर्णय जाहीर करण्यात आलेला होता. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढणार नसल्याचं शिंदे गटाने जाहीर केलं होतं. परंतु आज शिंदे गटाच्या आमदारांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे गट ही पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत कोणता निर्णय घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

Andheri Election News
Shivsena : ठाकरेंपुढील पेच वाढला! आयोगाच्या यादीत ठाकरेंनी पाठवलेले चिन्ह नाहीत

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघ रिक्त झाला असल्याने या मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान, भाजपने या मतदार सघांची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर सोपवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com