
मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०२५) राज्यात झालेली परकी गुंतवणूक ही देशातील एकूण परकी गुंतवणुकीच्या ४० टक्के एवढी आहे. या विक्रमी परकी गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करीत राज्यातील जनता आणि गुंतवणूकदारांचे अभिनंदन केले आहे.