Maharashtra Auto Rickshaw Strike : राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता

Bike Taxi Protest : मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये रिक्षा सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. संघटनांचा दावा आहे की बाईक टॅक्सीसाठी आवश्यक परवानगी, चालक बॅज, वाहन नोंदणी आणि पिवळी नंबर प्लेट यांचे नियम पाळले जात नाहीत.
Maharashtra Auto Rickshaw Strike: Date and Cities Affected

Maharashtra Auto Rickshaw Strike: Date and Cities Affected

esakal

Updated on: 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी (२३ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ऑटो रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी या संपाची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये या संपाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नोकरदारांसह विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...