परभणी बंद दरम्यान हिंसाचार झाला. त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. त्यामधील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्य झाला. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची आज हाक देण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बीड, परभणी, नांदेड, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये बंदला तसेच मुंबईमध्ये देखील समिश्र पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
परभणीच्या या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती आहे. सचिन खरात यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदला शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. अंबादास दानवे यांनी या प्रकरणात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी केली.