esakal | Maharashtra Bandh - मविआचे खासदार तेव्हा शेपूट घालून का बसले? मनसेचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील नागरिकांना एक दिवस बंद पाळावा असं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र बंद - मविआचे खासदार तेव्हा शेपूट घालून का बसले? मनसेचा सवाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - उत्तर प्रदेशात लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत राज्यातील नागरिकांनी एक दिवस बंद पाळावा असं आवाहन केलं आहे. मनसेने यावरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका केली आहे. जेव्हा संसदेत कृषी विधेयक मांडलं जात होतं तेव्हा तुमचे खासदार गप्प का होते असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून विचारला आहे.

संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेश मध्ये जी घटना झाली ती दुर्दैवी आहेच त्याचा निषेध व्हायलाच हवा. पण मा. वि. अ. चे खासदार जेंव्हा संसदेत शेतकरी विरोधी बिल मांडलं जात होतं तेंव्हा शेपूट घालून का बसले होते.

भाजपनेसुद्धा महाराष्ट्र बंदचा विरोध केला दर्शवला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवरून इशारा दिला की, जर जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली तर भाजप त्यांना प्रत्युत्तर देईल. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करावं असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; महाविकास आघाडी नेत्यांचे आवाहन

याआधीही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांवरून त्यांनी निशाणा साधला होता. तसंच ठाकरे सरकारला सवाल केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, सध्या सगळी कडे टाळे बंदी शिथिल झाली असताना अजूनही स्थायी समितीच्या बैठका आणि महापालिका सभागृह ऑन लाईन का चालू आहे?सगळं बंद ठेऊन विरप्पान गॅंग चे घोटाळे लपणार नाहीत ते आम्ही बाहेर काढणारच.

loading image
go to top